माझा नाविन्यपूर्ण उपक्रम -------------डबल दप्तर योजना
उपक्रमाचे नाव :- डबल दप्तर योजना .
उपक्रमचा कालावधी : - दर वर्षी .
शिक्षकाचे नाव :- देविदास शेवाळे जि.प.शाळा पिंपळगाव (वा)ता जि.नाशिक
. .
उपक्रम राबविण्याचे वर्ष: - सन २००५ पासून तरआजतागायत . .
उपक्रमाचा हेतू :- विध्यार्थांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे
उपक्रमची अंमलबजावणी:-ग्रामीण किंवा शहरी भागात दै नंदिन निरीक्षणातून दररोज आपल्यला पहावयास मिळते कि,शाळेत येणारी मुले आपल्या पाठीवर भले मोठे दप्तराचे ओझे ,हातात पाण्याची बाटली घेऊन येत असतात .तसेक ग्रामीण भागातील मुले शेतातून दोन-चांर किलोमीटर अंतरावरून ळेत येत असतात .६ते १४ वयोगटातील मुलांच्या वयाच्या मानाने दप्तराचे ओझे जास्त असल्यामुळे त्यांच्या पाठीवर ताण पडून पाठीच्या मणक्यांचे विकार झालेले आढळून आले आहे .त्यावर उपाय म्हणून आंम्ही आमच्या शाळेत डबल दप्तर योजना हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली.या उपक्रमात एक दप्तर शाळेत व एक दप्तर घरी नेले जाते .मुले फक्त त्या दिवसाचा जो अभ्यास दिला जातो त्याच विषयाचे दप्तर घरी नेतात त्यामुळे मुलांच्या दप्तराचे ओझे कमी झाल्यामुळे मुले आनंदाने शाळेत येतात.
फलश्रुती:-सदर उपक्रमामुळे पाठीवरचे ओझे कमी झाल्यामुळे पाठीवरील ताणतणाव व मणक्यांचे विकार कमी झाले आहेत .
प्रशिध्दी:- सदर उपक्रमाची दैनिक वर्तमानपत्रात व पुणे सकाळ वर्तमानपत्रातून राज्यभर प्रशिध्दी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने आमच्या उपक्रमाची दखल घेऊन ,राज्यातील सर्व शाळांसाठी आदेश काढून दप्तराचे ओझे कमी केले आहे .
v |
No comments:
Post a Comment