ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

वनराई बंधारा

वनराई बंधारा

पाणी अडवा पाणी  जिरवा  या उपक्रमातूनजिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव(वा)व जनता विद्यालय पिंपळगाव ता देवळा जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव (वा) येथे श्रमदान व समाजसह्भागातून वनराई बंधारा बांधण्यात आला .गेल्या अनेक वर्षापासून देवळा तालुक्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत .गटविकास अधिकारी मा. सी एल पवार साहेब यांच्या प्रेरणेने व केंद्रप्रमुख श्री.घनशाम बैरागी ,सरपंच बायटाबाई,उपसरपंच नदिश थोरात ,शाळा व्यवस्थापनसमिती अध्यक्ष श्रावण थोरात  यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यानी  गावात बांधकाम चालू असलेल्या ठिकाणाहून सिमेंटच्या रिकाम्या गोणीआनण्यास सांगितले.मुख्याध्यापक श्री .नानाजी सोनवणे ,देविदास शेवाळे ,दिगंबर इंगळे,भागीरथी सावकार ,प्रमिला देवरे,अनुसया सोनावणे ,चंद्रकला अहिरे,प्रतिभा पवार,सविता भामरे ,जनता विद्यालय पिंपळगाव मुख्या.सावकार सर,मगर सर,सर्व विध्यार्थी  यांच्या सहकार्याने पिंपळगाव येथील मळकी नदीवर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यातआला.

No comments:

Post a Comment