जि प शाळा झिरेपिंपळ ता. देवळा जि. नाशिक
उपक्रमाचे नाव :-अध्ययन अध्यापनात Expolrer For MergeCub Mobile App द्वारे 4D तंत्रज्ञानाच प्रभावी वापर .
शिक्षकाचे ना
उपक्रमाचा हेतू :-१)विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देणे.
२)प्रत्यक्ष अनुभवातून मनोरंजनात्मक शिक्षण देणे.
3)शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
उपक्रमाची अंमलबजावणी :-नवीन तंत्रज्ञानाचा शोध नेहमीच शिक्षकांना नवनवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहित करीत असतात . अध्ययन अध्यापनात Expolrer For MergeCub Mobile App द्वारे तंत्रज्ञानाच प्रभावी वापर. सूर्यमाले संदर्भात नवीन तंत्र ज्ञानाने डिजिटल असे मोबाईलच्या सहयाने आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देता येईल .माझ्या वर्गातील सर्व विध्यार्थ्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना हा प्रयोग करून दाखवला .प्रत्येक मुलाच्या हातात सूर्य पाहुनच मुले आनंदून गेली .सूर्यमाला व त्यातील ग्रह कसे फिरतात ?सूर्य हा प्रखर उष्णतेचा तप्त गोळा आहे.तासेच बुध,शुक्र,पृथ्वी,गुरु,मंगल,शनी,युरेनस,नेपचून प्लुटो या ग्रहांची अभाशी प्रतिमा प्रत्यक्ष हाताळून प्रत्येक ग्रहाचे व उपग्रहाचे वैशिष्टे ,अंतर,रंग,आकार, आवाज, आदी तपशीलास मुलांना माहिती दिली .या उपक्रमामुळे मुलांचे तंत्रज्ञानाशी नाते जोडले गेले.मुलांची शाळेविषयी गोडी वाढली.ओढ वाढली.ग्रहमाला जवळून बघता आली .नव्हे हाताळता आली.प्रत्येक ग्रहाचे सूक्ष्म निरीक्षण करता आले.सदर App चा वापर करून मुलांनी प्रत्यक्ष सूर्यमाला व ग्रह ,उपग्रह आपल्या हातात घेऊन अनुभवले.शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना या App विषयी माहिती दिली.डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विध्यार्थ्याचा हातात सूर्यमालेची प्रत्यक्ष अनुभूती देणारी देवळा तालुक्यातील पहिली शाळा ठरली.तसेच या उपक्रमाची whatsapp,You Tube,Face Book,मध्यमातून महाराष्ट्र राज्य भर सर्व शिक्षकांना माहिती दिली.आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांना या प्रयोगाविषयी माहिती देऊन सूर्यमालेची प्रत्यक्ष अनुभूती घेतली .हिच या उपक्रमाची फलश्रुती ठरली.
No comments:
Post a Comment