ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

आमची झिरेपिंपळ शाळा

 देवळा तालुक्यापासुन देवळा विठेवाडी रस्त्यावर  जिल्हा

परिषद प्राथमिक शाळा झिरेपिंपळ  ही शाळा पाच किलोमीटर अंतरावर वसलेली टुमदार शाळा इयत्ता १ली ते ७वी पर्यंत वर्ग आहेत व ६ शिक्षक कार्यरत आहेत सर्व शिक्षक हे ३१/०५/२०१८ आॅनलाईन बदली मध्ये बदलून आले. शाळा व गाव आमच्यासाठी नवीन होते. विद्यार्थ्यांची व पालकांचीही ओळख नाही. १५जून २०१८शाळा सुरु झाली पहिल्या दिवशी केवळ दोन तीन मुले शाळेत आली त्यांच्याशी ओळख करुन घेतली. सर्व शिक्षकांची ओळख झाली. दोन पदविधर शिक्षिका ६ते ८वर्गासाठी व चार शिक्षक १ते५या वर्गासाठी त्यात आमच्यापेक्षा सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षिका श्रीमती अनुपमा देवरे मॅडम याचेकडे मुख्याध्यापक चार्ज आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. विद्यार्थी हजेरी पाहिल्या, सर्व वर्गांची वर्गवाटणी झाली माझ्याकडे ४थीचा वर्ग आला होता. पहिल्या दिवशी जी दोन तीन मुले शाळेत आली होती ती माझ्याच वर्गातील त्यांना घेऊन प्रत्येक मुलामुलींच्या घरी भेटी दिल्या. दुसर्‍या आठवड्यात सर्व मुले शाळेत उपस्थित झाली. आणि प्रत्यक्ष अध्यापन करण्यासाठी सुरवात केली कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे याची चाचपणी केली, त्यानुसार नियोजन केले. पण विद्यार्थी अनुपस्थिती मुळे अडचणी निर्माण झाली असतांना शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक घेतली  आमच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेतली. सर्व विद्यार्थी हे शेतात, मळ्यात राहत असल्याने त्यांचे पालक हे मोलमजुरी करणारे असल्याने लहान मुलांना सांभाळण्याठी तर काही मुले पालकांनबरोबर मजुरी करण्यासाठी जात असत, अडचणी खूप होत्या त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढविणे आवश्यक होते. काही दिवस खेळ, गाणी,गोष्टी,नृत्य घ्यायला सुरुवात केली आणि विद्यार्थी उपस्थिती वाढू लागली, शाळेत प्रोजेक्टर होते संगणक बंद पडले होते त्याची दुरुस्ती करून घेतली. मग आॅनलाईन आॅफलाईन  अध्यापन सुरु केले, युट्यूब वरील शैक्षणिक पाठ, व्हिडिओ वापर सुरु केला. स्वतः शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करुन आनंददायी अध्यापणाला सुरवात केली याची चर्चा पालकांना कळाली आणि विद्यार्थी उपस्थितीत नक्कीच वाढ झाली. 


No comments:

Post a Comment