आपले सोबती
उपक्रमाचे नाव :-आपले सोबती उपक्रमाचा कालावधी :-फेब्रुवारी ते मे
उपक्रमाचा हेतू :- टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वस्तू निर्मिती (प्लास्टिक कॅन)
उपक्रम तयार करणाऱ्या शिक्षकाचे शिक्षकाचे नाव :-श्री देविदास शिवाजी शेवाळे (प्रा .शिक्षक )
शाळा :- जि.प.शाळा पिंपळगाव (वा) ता.देवळा जि .नाशिक
उपक्रमाची अंमलबजावणी:-ज्या प्रमाणे अन्न वस्र निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत .त्या प्रमाणेआपल्या सभोवती राहणारे अनेक पक्षी राहतात .त्यांना हि अन्न निवारा पाणी यांची आवशकता असते .मुलांना घरून रिकाम्या तेलाच्या कॅन आणावयास सांगितले त्या प्रमाणे मुलांनी दहा ,बारा कॅन आणल्या त्यांना कल्पकतेने विविध आकार कापून ,पक्षी घरटे ,पक्षी पाणवठा ,पक्षी खानावळ तयार केल्या .आणि विशिष्ट अंतरावर झाडांना टांगल्या .मुले नियमित पाणी व खाण्यासाठी अन्न ठेवतात त्यामुळे आज शालेय आवारात पक्षांची किलबिल वाढली आहे .
फलनिष्पत्ती:प्राण्यांवर दया करणे
धन्यवाद
No comments:
Post a Comment