ज्ञानज्योती सावित्री शैक्षणिक ब्लॉग.ता देवळा जि.नाशिक

सेमी इंग्रजी

सेमी इंगजी व ई-लर्निग 
सन २००८/०९ या शैक्षणिक वर्षातशाळेत नवीन काहीतरी उपक्रम 
सुरु करावा असे वाटत होते.खाजगी शाळांकडे वाढणारी विध्यार्थी 
संख्या या कारणांचा अभ्यास केला.आपल्याही शाळेत असे उपक्रम 
सुरु करण्याचे ठरवले .यासाठी शाळा व्यवस्थापनसमिती,माता पालक 
संघ ,शिक्षक पालक संघ ,मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांच्याशी वेळोवेळी 
विचारविनिमय करून शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले.या साठी तुम्ही जबाबदरी घ्या असे सांगितले.मी स्वत; जबाबदारी स्वीकारली आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत ठराव करून मा.गटशिक्षणाधिकारी प.सं.देवळा व मा.शिक्षणाधिकारी जि.प.नाशिक यांचेकडे परवानगी साठी 
पाठविला .तात्काळ परवानगी मिळाली .गावातील लोकांनाही खूप आनंद 
झाला.कारण खाजगी शाळा अमाप फी घेत असत पालकांना खर्च 
परवडण्यासारखा नव्हता.जि.प.सदस्या उषाताई बच्छाव,प्रभारी गटशिक्षणाधिकारी,मा सतिश बच्छाव,मा.विस्तार अधिकारी पुष्पावती 
पाटील ,सामाजिक कार्यकते नदीश थोरात ,शाळा व्यवस्थापन समिती 


अध्यक्ष विश्वास पाटील ,मुख्याध्यापक नानाजी सोनवणे ,सर्व शिक्षक वृंद,विध्यार्थी पालक यांच्या समवेत सेमी इंगजी व ई -लर्निग वर्गाचे 
उद्घाटन करण्यात आले.त्याचे प्रात्यक्षिक देविदास शेवाळे यांनी केले .

1 comment:

  1. सेमी इंग्रजी अध्यापन हे अनुचित व बालकांच्या शैक्षणिक दृष्टीने भाषिक अडथळाच असून पूर्वी प्रमाणे मातृभाषेतून गणित विषय पाहिल्यावर्गापासून शिकवा.

    ReplyDelete